Followers

Friday, 30 May 2025

मराठी गझल - कबिराचे दोहे सुचले

मराठी गझल - कबिराचे दोहे सुचले 
 

फुललेल्या नात्यावर जेव्हा ऊन पसरले
केवळ काही आठवणींचे वसंत उरले

शब्दाने तर बोलत नव्हते कुणीच काही
मौनामध्ये त्यांच्या पुढचे वास्तव दिसले

कुणी टाकला खडा स्मृतींच्या डोहामध्ये
मन पटलावर हलके हलके तरंग उठले

आभाळाला साद घातली कोडे सुटले
थेंबांचे मग मोती झाले क्षण गहिवरले

हवी कशाला इथे कुणाची मिरासदारी
कसेल त्याची जमीन या धर्तीवर म्हणले

सहजासहजी असे कधीही घडले नाही
दुःखाच्या जागेवर कोणी सुख पांघरले

जर हे झाले असते तर ते झाले असते
जर तर करता करता सारे जीवन सरले

भान नसावे.. उन्मन व्हावे.. या देहाने
आणि शेवटी जर कबिराचे दोहे सुचले

चंदना सोमाणी ©®

4 comments:

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. गझलेने तर गझलेसाठी तुला निवडले...👌👍❤️
    कबिराचे दोहे सुचणे हे तर सोन्याहून पिवळं...प्रत्येक कवीच्या मनातलं...❤️🌹
    वाह कमाल ...❤️❤️❤️😘
    प्रतिभा, साधना, आध्यात्मिक ज्ञान असेल तरच अशा गझल निर्माण होतात...गझल वाचताना इश्वरी आनंद होतो, गझल सम्राज्ञी कायमच नतमस्तक व्हावे ह्या शब्दांसाठी... 🫡 🫡 🫡 🫡 🫡

    ReplyDelete
  3. वास्तव परिस्थिती ला एकदम साजेशा शब्दात मांडल आहे.... नेहमीप्रमाणे अप्रतिम शब्दरचना

    ReplyDelete
  4. वाह 👌👌👌

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...