Followers

Thursday, 20 June 2024

मराठी गझल - तरी जन्म हासला

गझल - तरी जन्म हासला
 

किती डंख सोसले किती जीव त्रासला
किती खंत जाहली तरी जन्म हासला 

तुझी सावलीच ती तरी भेद हा कसा 
असे पौर्णिमा जरी नभी चंद्र ग्रासला

नको श्रावणा तुझी इथे कोरडी हवा 
बरसल्याविनाच तो पयोधर प्रवासला 

असे चंद्रमा जरी तुझ्या अंतरातला 
खरा आरसाच तो समाजास भासला 

जरी श्वास थांबला कुणी ना विचारले 
तरी चंदनापरी उभा जन्म घासला 

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. आशयगर्भ गझल चंदनाची......❤️❤️

    सर्व असूनही नसल्या सारखे.......
    व्यक्त होण्यास शब्द झाले माझे पारखे......

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद 🌹🌹

      Delete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...