भीमराव पांचाळे दादांनी दिलेल्या #कविश्रेष्ठ..#गझलसम्राट..आदरणीय #सुरेश भट साहेब यांच्या ओळी वर तरही गझल लिहिण्याचा माझा एक प्रयत्न....."
नाही म्हणावयाला आता असे करू या"......
गझल - नाही म्हणावयाला
नाही म्हणावयाला आता असे करूया
क्षण जे उडून गेले त्यांना पुन्हा स्मरू या
केला कुणी असा हा सगळीकडे पसारा
दोघे मिळून थोडा संसार आवरू या
काटे जरी मिळाले मार्गावरी कितीदा
चोहीकडे फुले या वाटेत अंथरूया
उध्वस्त कोण करतो फुलबाग या मनाची
फिरुनी अता मशागत चल ना पुन्हा करूया
रिमझिम नको पुन्यांदा नाजूक भावनांची
आभाळ आसवांचे डोळ्यात सावरू या
निसटून चालली बघ हातामधून वाळू
जाऊन थेट मागे आपण तिला धरू या
आधीच सोडवूया हा प्रश्न जीवघेणा
एल्गार जीवनाचा केल्यावरी मरू या
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment