Followers

Thursday, 11 April 2024

मराठी गझल - काही केल्या

गझल - काही केल्या 

काही केल्या आग दिसेना 
डोळ्यांमध्ये जाग दिसेना

अंधारावर लाख कवडसे 
चंद्रावरचा डाग दिसेना 

असे कसे हे लोक दोगले 
सदाशिवाचा नाग दिसेना 

उजाड झाला डोंगरमाथा 
पिंपळ, बाभळ, साग दिसेना 

मृगजळ आहे जिकडे तिकडे 
पाण्याचा भू-भाग दिसेना 

सुखे नांदती इथे सुखाने 
दुःखाचा मग माग दिसेना 

मायेच्या त्या पदरावरती 
मला कशाचा डाग दिसेना 

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. वास्तवाचे प्रतिबिंब.........!

    गझल चंदनाची की चंदना गझलेची... 🤔

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...