गझल - काही केल्या
काही केल्या आग दिसेना
डोळ्यांमध्ये जाग दिसेना
अंधारावर लाख कवडसे
चंद्रावरचा डाग दिसेना
असे कसे हे लोक दोगले
सदाशिवाचा नाग दिसेना
उजाड झाला डोंगरमाथा
पिंपळ, बाभळ, साग दिसेना
मृगजळ आहे जिकडे तिकडे
पाण्याचा भू-भाग दिसेना
सुखे नांदती इथे सुखाने
दुःखाचा मग माग दिसेना
मायेच्या त्या पदरावरती
मला कशाचा डाग दिसेना
चंदना सोमाणी ©®

वास्तवाचे प्रतिबिंब.........!
ReplyDeleteगझल चंदनाची की चंदना गझलेची... 🤔
धन्यवाद 🌹🌹
Delete