गझल - दिवा
मिट्ट काळोखात सुद्धा तेवतो आहे दिवा
अन् स्वतःच्या भोवती अंधारतो आहे दिवा
पेटला होता निखारा काजळीच्या आतही
शेवटी विझला तरीही धुमसतो आहे दिवा
घात केला आपल्यांनी आणि आली संकटे
पांगळ्या पायांसवे तेजाळतो आहे दिवा
लुप्त झालेल्या दिशांची एक काळी रेघ तू
हे असे म्हणता क्षणी आभाळतो आहे दिवा
धूळ चढलेल्या क्षणांचा मागतो आहे ठसा
ह्या कुण्या गावात आता हरवतो आहे दिवा
वादळे आली किती अन् वादळे गेली किती
पण युगांचा वारसा सांभाळतो आहे दिवा
अन् स्वतःच्या भोवती अंधारतो आहे दिवा
पेटला होता निखारा काजळीच्या आतही
शेवटी विझला तरीही धुमसतो आहे दिवा
घात केला आपल्यांनी आणि आली संकटे
पांगळ्या पायांसवे तेजाळतो आहे दिवा
लुप्त झालेल्या दिशांची एक काळी रेघ तू
हे असे म्हणता क्षणी आभाळतो आहे दिवा
धूळ चढलेल्या क्षणांचा मागतो आहे ठसा
ह्या कुण्या गावात आता हरवतो आहे दिवा
वादळे आली किती अन् वादळे गेली किती
पण युगांचा वारसा सांभाळतो आहे दिवा
चंदना सोमाणी ©®

तेजस्वी, दैदिप्यमान गझल...विलक्षण उर्जा, जगण्याची आशा, सकारात्मकता पेरली गझलेत हे साधारण नाही फार मोठे दिव्यत्व आहे... 🫡🫡🫡🫡🫡
ReplyDeleteगझल विश्वातील प्रकाश म्हणजे चंदना.. जी गझलेचा वारसा पुढे नेत आहे. गझल सम्राज्ञी तुस्सी ग्रेट हो... ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘