Followers

Wednesday, 5 November 2025

मराठी गझल - मनबिंब पाहते मी

गझल- मनबिंब पाहते मी 

पाण्यात या नभाचे प्रतिबिंब पाहते मी
सूर्यास त्या क्षणाला मग चिंब पाहते मी

हे रूप गोजिरीचे ते रूप साजिरीचे
ऐन्यात हासणारे डाळिंब पाहते मी

हा डाग विस्तवाचा की दाह वास्तवाचा
जो ठेवला मनी तो कडुलिंब पाहते मी

रेखाटली जरीही मी वर्तुळे कितीही
एका क्षणात का मग हे टिंब पाहते मी

आहे जरी दुरावा दोघांमधे तरीही
माझ्या तुझ्या मनाचे मनबिंब पाहते मी

चंदना सोमाणी ©

4 comments:

  1. आकाशाची अथांगता नेहमीच तुझ्या शब्दात सामावलेली असते आणि म्हणूनच गझल जीव की प्राण होऊन जाते आणि आम्हा रसिकांच्या मनावर कायम राज्य करते.... गझल सम्राज्ञी ❤️😘
    🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐

      Delete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...