Followers

Sunday, 22 February 2026

मराठी गझल - दुःख माझे

गझल - दुःख माझे

तुला कळलेच नाही दुःख माझे
जरी हे बारमाही दुःख माझे

फुलांशी वैर नव्हते फारसे पण..
तरी सलतेच काही दुःख माझे

पुन्हा भेटू नको म्हणणेच नाही
असो आता प्रवाही दुःख माझे

सलोखा ठेवला होता सुखाशी 
पुढे देणार ग्वाही दुःख माझे

तसे तर दुःख निवडू की तुला मी
अरे ही वेदनाही दुःख माझे

कधी ना संपणारा हा दुरावा
तरीही बादशाही दुःख माझे

तुला पाहून हे कळते मलाही
किती छळते तुलाही दुःख माझे

चंदना सोमाणी ©®

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...