गझल - शेवटी गर्दीच ही
हे असे झाले कसे
का पुढे गेले ससे
भेटले होते मला
फार आधी कवडसे
दे... मला तू आग दे
अन् भरीला कोळसे
प्रेम हे माझे तुझे
ठेव तू आहे तसे
पाहिले डोळ्यात मी
हासणारे आरसे
चार भिंतींना पुन्हा
नाव सुचले छानसे
शेवटी गर्दीच ही
कोणती ही माणसे
चंदना सोमाणी ©®

गझल म्हंटले की चंदना सोमाणी हे समीकरण माझ्यासाठी पक्क झालं....😊😊
ReplyDelete"छोटी बहर मोठ्ठा कहर..."
कुठलाच शेर डावलता येत नाही गंऽऽऽ बाई 🤗
मानवी मनाच्या अंतर्मनात डोकावण्याची तुझी प्रतिभा एखाद्या अभ्यासकाला सुद्धा जमणार नाही इतक्या उंचीवर आहे. गझल वाचताना तिचे किती कौतुक करावे आणि किती नको असे होऊन जाते. जियो मेरी लाडो और हजारो साल ऐसेही लिखती रहो गझल सम्राज्ञी ❤️❤️❤️😘😘😘