Followers

Sunday, 15 September 2024

मराठी गझल - एकेक पाकळी

गझल - एकेक पाकळी 

एकेक पाकळी गळणार शेवटी
मृत्यो तुझ्या खुणा दिसणार शेवटी 

बांधून घेतली लेणी सुबक जरी
कोरीव दुःखही हसणार शेवटी

किंतू मनातला काढून टाकला
पण वाद हा जुना उरणार शेवटी

वेचू नकोस तू कण कण मनातले
अंदाजही तुझे चुकणार शेवटी

हा चेहरा नको अन् आरसा नको
प्रतिमाच आपली फसणार शेवटी

हेतू न चांगला तू हे म्हणू नको
तो मर्म त्यातला कळणार शेवटी

हा देह जाळला मी चंदनापरी
राखेतही फुले फुलणार शेवटी

चंदना सोमाणी ©®

1 comment:

  1. तुझा जन्म फक्त गझलेसाठीच झाला, कारण गझलेतील मर्म तुला चांगलेच कळले आहे.
    गझल सम्राज्ञी चंदना निश्चितच भट साहेबांनी तुलाच खो दिला आहे. 🫡🫡🫡
    प्रत्येक शेर कोरीव आणि दाणेदार...❤️❤️❤️😘😘

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...