Followers

Friday, 27 September 2024

मराठी गझल - जणू

 

गझल - जणू 


नजारा छानसा दिसला जणू...
सुखाने वाफसा धरला जणू...

चला सुरुवात झाली चांगली
मला मिसरा उला सुचला जणू...

जसा हातात आला आरसा
भ्रमाचा भोपळा फुटला जणू...

खरे बोलायचे होते जिथे
तिथे खोटेपणा डसला जणू...

जरा पाणावले डोळे तिचे
मखर अश्रूंमधे सजला जणू...

खरा उरला कुठे हा कायदा
इथेही न्याय तर हरला जणू...

तसा तर भास की आभास हा
अहम् माझ्यातला गळला जणू...

चंदना सोमाणी ©®

1 comment:

  1. हिरा जसा कोंदणात शोभतो तसा प्रत्येक शब्द तुझ्या गझलेत शोभून दिसतो..💎💎 तुझ्या प्रत्येक गझलेत नवनवीन कमालीचे शब्द वाचायला मिळतात जसे की ह्या गझलेत "सुखाने वाफसा धरला जणू"..... गझल सम्राज्ञी काय बोलू निरंतर ✍️ रहा 🫡🫡🫡
    प्रत्येक वेळी वेगळी हटके रदीफ हे ठरलेलेच आहे जणू...🤗 🌝

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...