गझल - हो ना..?
आतल्या कोलाहला तू शांत होना
पाहिजे आहे तुला एकांत.. हो ना ?
मेणबत्ती आणि रस्ता.. ह्याच गोष्टी
वासनेला अंत ना सीमांत.. हो ना ?
घर जळाले तर जळू दे.. काय जाते
फक्त आपण वाचतो वृत्तांत..हो ना ?
ढग जमा झालेच आहे जर मनावर
हाच अश्रूंचा खरा सिध्दांत.. हो ना ?
प्रेम करतो आणि म्हणतो प्रेम नाही
बोलतो खोटे किती धादांत.. हो ना ?
वाळवंटातून जातो मार्ग माझा
हा तसा नाही फुलांचा प्रांत..हो ना ?
जर सुखांचा पाहिजे गोतावळा तर
दांभिकांचा अंत कर कृतांत होना
चंदना सोमाणी ©®

गझलेत फक्त गझल सम्राज्ञी चंदना... हो ना..❤️😘
ReplyDeleteएका शेरातून बाहेर पडावे न पडावे तोच समोर दुसरा ताकदीचा, हटके शेर.. हटके काफिये ...
मनाला घायाळ करणारी प्रश्नावली ...
शब्दांचे अतोनात सामर्थ्य, विचारांची आकाशउंची काय काय आणि कशा कशाची तारिफ करावी सारेच विचारांच्या पलीकडले.. तुझ्यासाठी हा फुलांचाच प्रांत आहे. 🌹🌸🌷🌷💐🌸🌹