गझल - शिवाजी
अंधारावर मात शिवाजी..
एक नवी सुरवात शिवाजी..
उंचावरचा चंद्र सांगतो..
जिती जागती रात शिवाजी..
मावळचा हा गडी रांगडा..
मानत नाही जात शिवाजी..
शत्रूला हमखास भेटतो..
प्रत्येकाच्या आत शिवाजी..
सह्याद्रीच्या कडेकपारी..
दिशादिशांना ज्ञात शिवाजी..
भोळ्याभाळ्या रयतेसाठी..
पाठीवरचा हात शिवाजी..
स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती..
'अरमानोकी बात' शिवाजी..
इतिहासाच्या पानोपानी..
पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी..
असाल जेथे दिसेल माझा..
या साऱ्या विश्वात शिवाजी..
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment