गझल - दुःखाची खळगी
मी दुःखाची खळगी केली
अन् पोटाशी सलगी केली
मला तरी हे कुठे समजले
पाव्याची का हलगी केली
नवा रंग नात्यास मिळाला
सून नव्हे तर मुलगी केली
कुणीच नव्हते ऐकत तेव्हा
मैत्रीसुद्धा अडगी केली
कोपऱ्यात तर भरून होती
कुणी रिकामी कणगी केली
पुन्हा एकदा आग लावली
पुन्हा एकदा ठिणगी केली
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment