Followers

Tuesday, 2 April 2024

मराठी गझल - प्रेम तुझ्यावर

गझल - प्रेम तुझ्यावर

प्रेम तुझ्यावर करता आले असते तर...
पुन्हा एकदा जगता आले असते तर...

शाळेमधल्या बाकावरती नाव तुझे
माझ्यासोबत बघता आले असते तर...

जाळी पडून सुद्धा सुंदर दिसते ना?
तसेच सुंदर दिसता आले असते तर...

शेवट त्याचा गोडच व्हावा म्हणून तर
रडता रडता हसता आले असते तर...

विझता विझता फडफड होते ज्योतीची
मनाप्रमाणे विझता आले असते तर...

जे घडले ते नकोच होते घडायला
चुकलेले निस्तरता आले असते तर...

नाव सारखे म्हणून सारा दरवळ...पण,
तुला चंदना झिजता आले असते तर...

चंदना सोमाणी ©®

5 comments:

  1. अख्ख आयुष्य व्यापून उरणारी गझल....परत परत वाचताना पुन्हा एकदा कमेंट द्यायचा मोह आवरता आला नाही. चंदना the great जिओ लाडो ❤️😘❤️

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...