Followers

Sunday, 14 April 2024

मराठी गझल - जोगवा गुलाबी

गझल - जोगवा गुलाबी 

भेट म्हणाली पुन्हा नव्याने हवा गुलाबी 
ओंजळीत घे आठवणींचा थवा गुलाबी

रंग कोणता वेढत आहे आकाशाला 
प्रेम म्हणू की म्हणू कोणती दवा गुलाबी

भेटत गेला एक ऋतू मग नवखा नवखा 
होतच गेला सोबतीस गवगवा गुलाबी

लिहिते आहे गझल तुझ्यावर खरोखरी मी 
त्याला कोणी निरोप हा पोचवा गुलाबी

नाते सुद्धा पहिल्या इतके सुंदर झाले 
जितका सुंदर नभातला चांदवा गुलाबी

दिले झुगारून दुःख सारे..व्यथा, वेदना... 
अन् मागितला प्रीतीचा जोगवा गुलाबी

चंदना सोमाणी ©

2 comments:

  1. निसर्गाला एखादी गोष्ट सांगायची असेल तर तो एक प्रगल्भ, प्रतिभावान व्यक्ती शोधतो त्याने तुला निवडले आहे. प्रत्येक पिढीत एक व्यक्ती अशी असते की ज्यांचे लेखन उच्चतम कोटीचे असते म्हणून ते सर्वांना आवडत असते त्यातलीच एक तू ❤️😘
    💗💗 नजाकत से भरी...वाहवा गुलाबी गझल💗💗 तुझी गझल आली की तिच्याकडे बघतच रहावे दिसतांनाच ती इतकी सुंदर दिसते...वाचताना आत्मतृप्तीचा आनंद देते आणि कमेंट मध्ये काय काय लिहावे शब्दच सुचत नाही. कोणताही एक शेर भारी म्हणताच येत नाही अख्खी गझल हटके असते तरीही चांदवा,जोगवा जीव ओवाळून टाकावा. 💞💞 इतके नवखे शब्द असतात की प्रत्येक शब्द तुझ्याचसाठी बनला आहे. 💗😘

    ReplyDelete
    Replies
    1. फारच सुंदर अभिप्राय आहे हा... खूप खूप धन्यवाद 🌹

      Delete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...