Followers

Monday, 22 April 2024

मराठी गझल - नकली निखारा

गझल - नकली निखारा 

आग, पाणी आणि पारा वाटतो 
हा मला नकली निखारा वाटतो 

व्यर्थ आहे हा उन्हाळा अन् पुन्हा 
पावसाचाही पसारा वाटतो 

प्रश्न हा ही लांब ठेवू या पुढे 
सागराला कोण खारा वाटतो 

वादळा देऊ तुलाही शांतता 
शेवटी तू...ही बिचारा वाटतो 

भोवताली पाहुनी चांदणचुरा 
हा निळाईचा किनारा वाटतो 

कोणत्या बागेतली आहे व्यथा 
जन्मही गंधाळणारा वाटतो 

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. तुझ्या आवडत्या भट साहेबांचा वारसा तू समर्थपणे चालवत आहे चंदना....🙏👍
    एक एक शेरातील भावगर्भता वाखाणण्याजोगी आहे...!
    तुझी प्रत्येक गझल मला मंत्रमुग्ध करते, आनंदोत्सव असतो माझ्यासाठीही आणि प्रत्येकासाठी
    शब्दांच्याही पलिकडली गझल 👌👌👌😘😘❤️❤️

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून खूप खूप धन्यवाद 🌸🌸

      Delete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...