Followers

Friday, 11 July 2025

वेल्हाळ पाऊस...

वेल्हाळ पाऊस 

जशी चाहूल लागली 
तसा चातक हसला 
मला वेल्हाळ पाऊस 
त्याच्या डोळ्यात दिसला 

एका एका थेंबासाठी 
किती किती आतुरला 
बोरी बाभळीचा काटा 
खोल पायात रुतला

थेंबा थेंबात साठला
माझ्या पुढ्यात ठाकला 
डोळे आकाशाला आले 
आणि मेघ पाझरला 

पावसाने दिली साथ 
बळीराजा सुखावला 
शेत शिवारात साऱ्या 
पुन्हा पाचू उगवला 

चंदना सोमाणी ©®

1 comment:

  1. चातका पासून पाचू पर्यंत अविरत बरसणारा पाऊस मनाला आणि पावसाला सुखावून गेला. शब्द सरींच्या कोंदणात बसवलेला पाचू मनाला तजेला देऊन गेला.
    देखणी अष्टाक्षरी...👌👌👌
    तू आहेसच #निसर्गकन्या म्हणूनच तो तुझ्या शब्दा शब्दातून उतरतो डिअर सलाम कायमच 🫡 🫡 🫡 🫡 🫡 ❤️😘

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...