Followers
Wednesday, 29 May 2024
Sunday, 26 May 2024
माझे दोन शब्द - मी आस्तिक मी नास्तिक
देव आहे की नाही..? भुत-प्रेत आहे की नाही..? स्वर्ग नर्क हे अस्तित्वात आहेत की या कल्पना..? हे, ते, असे अनेक प्रश्न..???????????????
बापरे मनाला किती प्रश्न पडतात नाही...?
मला नाहीत तर जवळपास सर्वांनाच ही प्रश्न पडतात ज्याची उत्तरे अधांतरीच......
यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का ? किंवा करतो का..?
पण समजा आपल्या हाती असाच प्रश्न उत्तरांचा उहापोह असलेला वैचारिक ग्रंथ हाती आला तर आवडेलच ना वाचायला...?
हो नक्कीच! कुणाला नको आहे शंकांचे निरसन...!
अशाच सर्व मनातील प्रश्नांचा उहापोह करणारे दुकान म्हणजेच लेखक पुष्कराज गावंडे दादांचा वैचारिक ग्रंथ " मी आस्तिक मी नास्तिक "....
सहज, सोपी, ओघवती भाषा शैली तसेच मधेच येणारी सुंदर वर्हाडी भाषा मनाचा ताबा घेत गेली आणि पुस्तकाचा फडशा एका दमात पाडला...
देव आहे तर तो कसा आहे..?
कुठे आहे..?
तो आपल्याला दिसत का नाही...?
अशीच प्रश्ने मलाही नेहमीच पडत, मला पुस्तक वाचायच्या आधी वाटायचे की जगात आपण एक वेडे आहोत की काय पण इथे तर हे सारेच प्रश्न लेखकालाही पडलेले दिसतात. देवाचे अस्तित्व नाकारावे की स्वीकारावे लेखकासोबतच प्रत्येकाला पडलेला प्रश्न...?
देवाला मानावे तर आस्तिक नाही मानावे तर नास्तिक असा हा सामाजिक दृष्टिकोनाचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो यातून लेखकही सुटलेला नाही याचा प्रत्यय आपल्याला वाचताना येतो...
जेव्हा लेखकाचे मित्र लेखकाला नास्तिक, " बेअक्कल हाय लेकाचा" असे हिणवतात...
देवाचे अस्तित्व आपण स्वीकारावे की नाही ह्या स्वतःला उद्भवलेल्या प्रश्नामुळे " मी आस्तिक मी नास्तिक" हे या वैचारिक ग्रंथाचे नाव अगदी समर्पक ठरते...तसेच त्या नावाला साजेसे मुखपृष्ठ व मलपृष्ठावर असणारी दादाची सदरील ग्रंथाला साजेशी छबी...सर्वच उत्तम...!
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने गौतम बुद्धांच्या पासून ते आज पर्यंतच्या भोंदू साधू बाबांपर्यंत बराच वैचारिक उहापोह केलेला दिसून आला...!
हा जरी वैचारिक ग्रंथ असला तरी वाचतांना लेखकाची मिश्किल शैली गंभीरपणा जाणवून देत नाही त्यामुळेच वाचतांना हसे आवरत नाही. प्रकरण 30 आणि 35 प्रकरण वाचतांना हास्याची तर खसखसच पिकते...
इथे लेखकाने अनेक पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे मागताना सर्व देवा- धर्माप्रती संत महात्म्यांचा आदर करून त्यांच्या प्रश्नांमुळे जर कोणाची मने दुखावली गेली असतील तर मोठ्या मनाने माफी देखील मागितली आहे. यात जे प्रश्न लेखकाचे आहेत तेच प्रश्न तुमचे, माझे, सर्वांचेच आहेत. हे प्रश्न कोणी विचारतात तर कोणी मनातच पडताळून पाहतात कारण देवाधर्माविषयी अशा प्रश्नांची कुठे वाच्यता केली तर समाज काय म्हणेल..? हा प्रश्न समोर उभा राहतो...
लेखनातून शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुंदररित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत आणि भ्रष्टाचारावरही कोरडे ओढण्यात लेखकाने काहीच कसर ठेवली नाही...
जातीभेद पाळणे चांगले की वाईट यावर लेखक म्हणतो, की माझ्यामते जाती पाळाव्यात पण फक्त उच्चनीच भेदभाव पाळू नये तो वाईट! जाती वा 'आपला समाज' ही गोष्ट तुमच्यासाठी एक संरक्षण आहे. एक कवच आहे. ती तुमची कुंडले आहेत. ती गळून पडली तर तर तुम्ही तगू शकणार नाही. तुमचा कर्ण होईल....
एकंदरीत लेखकाने सदर ग्रंथात सर्व विषयांचा कट्टा-चिट्टा स्पष्ट व समर्पक शब्दात पेलला आहे...
माणूस कितीही नास्तिक असण्याचा आव आणत असला तरी त्याच्या मनात एक कोपरा हा श्रध्देचा असतोच, पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपराचा पगडा हा मानवी जीवनावर कितीही नाही म्हटले तरी असतोच...एकप्रकारची अनामिक भिती ही त्याठिकाणी असतेच म्हणून जो देवाला मानत नसल्याचे आव आणतो तो देखील देवाला भितो...तसे पाहिले तर देव अस्तित्वात आहे नाही हा विषय लांबच परंतू एक अज्ञात शक्ती असते जिला आपण श्रद्धा असे म्हणतो...
सदरील ग्रंथात मी कुठेही माझं ज्ञान पाजळलेलं नाही, तर मी, माझं अज्ञान प्रकट केलेलं आहे! कुठलाही अहंभाव नसलेलं मलपृष्ठावरील हे वाक्य लेखकाच्या मनाच्या महानतेची खोली सांगून जातं
स्वतः लिहून झाले रिकामे पण आमच्या विचारांचे मात्र चक्र सुरू करून....
शेवटी प्रश्न हे प्रश्नच राहतात...
तसे पाहिले तर एखाद्या पुस्तकाविषयी ही माझी पहिलीच समीक्षा ते घरचा आहेर म्हणजे माझा दादा त्यामुळेच मी समीक्षा करावयास धजले....
तरीही जर चुकून काही अधिक उणे असल्यास माफी असावी
चुक भुल देणे घेणे....
चंदना सोमाणी ©®
चार ओळी - ४
मराठी गझल - डोळ्यात आसवांचा
Saturday, 25 May 2024
मराठी गझल - पहाटवारा
Thursday, 23 May 2024
सत्याचा विजय...
संपादक - संतोष थोरहाते
विदर्भ मतदार मधून साभार....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सत्याचा विजय...
"नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसूनही माझ्याकडे वेगळा रंग नाही असं कसं म्हणू शकतं कोणी ? अगं! त्या सरड्यानेही इतके रंग कधी बदलले नसतील इतके रंग बदललेस तू या नऊ दिवसात... आणि तरी पुन्हा तेच, कोणती साडी नेसू म्हणे... तुझ्या कपाटाला साड्यांचे 'माहेरघर' म्हणता येईल इतक्या साड्या असतील त्यात..."
"हम्म! तुम्ही असंच बोलणार तेही कायम वाकड्यात, खेकड्याची आणि तुमची जातकुळी एकच. आणि शेजारच्या साक्षीशी बोलताना काय म्हणालात तुम्ही? ऐकलं म्हटलं मी, मला सरड्याची उपमा आणि तिला काय तर इंद्रधनुष्याची.. वा रे वा !"
अगं अगं! किती हा जळकुटेपणा तुझा, तुझ्याशिवाय इतरांची स्तुती करायची नाही असं लिहून ठेवलंय का कुठे? जे डोळ्यांना दिसतं तेच तर बोलायचं असतं ना!"
"तर तर, डोळ्यांना भिंग लागले असतील तुमच्या. तुम्हाला जर 'देखणी बायको दुसऱ्याची' दिसत असेल तर आम्हा बायकांनाही 'नवरे सगळे गाढव' दिसतात म्हटलं..."
"असू दे हो, खरं बोललं तर सख्या बापाला ही राग येतो असं म्हणतात. आज विजयादशमी वाईटावर चांगल्याचा विजय पण: कुठे होतांना तर दिसत नाही. नेहमी तुझेच घोडे पुढे धावताना दिसते. बरं! ते जाऊ देत, दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. शुभ कार्याची सुरुवात याच दिवसापासून होते तर आजपासून तू नेहमी पती आज्ञेत राहशील अशी नवी सुरुवात करायला काय हरकत आहे..."
ठीक आहे.. मान्य पण; एक विसरताय तुम्ही, जशी आज शुभ कार्याची सुरुवात करतात तशीच नवीन खरेदी देखील. दसऱ्याला आपट्यांची पानं "सोनं" म्हणून वाटण्याची प्रथा आहेच, म्हणजे बघा आपट्याच्या पानांना सोने समजून निसर्गास ओरबाडण्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा मी कालच नेटवरून तोड्यांची डिझाईन पाहून आपल्या सोनाराला आम्ही खरेदीसाठी जोडीने येत असल्याची वर्दी दिलीच आहे आणि तथास्तु मध्ये येवल्याच्या पैठणीची सुद्धा. तेवढी येता येता आणू हं... चला तर शुभस्य शीघ्रम..."
बायकोनं बांधलेल्या सीमेचं उल्लंघन करायचं म्हटल्यावर बाराच्या भावात तर पडणारच ना...?
नेटवर वाचले की पूर्वी राजेरजवाड्यांच्या काळात लूट आणून देवीपुढे ठेवण्याची प्रथा होती, त्याकाळी लूट म्हणजे मिळकत आणि आजही तीच प्रथा सुरू आहे.. लुटीच्या जागी 'पगार' आणि देवीच्या जागी 'बायको' इतकाच काय तो फरक...
यात कुणी आनंद लुटला तर कुणाचा खिसा लुटला गेला आणि अशा तर्हेने खऱ्या अर्थाने सीमोल्लंघनाचा दिवस सार्थकी लागला..
आता इथे कुणाचा कुणावर विजय झाला, हे सुज्ञास सांगणे न लगे...
चंदना सोमाणी पुणे
Sunday, 19 May 2024
चंदोळी - २
Saturday, 18 May 2024
और ये बारिश...
Thursday, 16 May 2024
माझे दोन शब्द - फडे मधूर खावया
रसग्रहण - चंदना सोमाणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,सध्या काय वाचत आहे, मैत्रिणीने फोनवर विचारले.
अगं, ते गझलगंधर्व सुधाकर कदम आहेत ना माझ्या फ्रेंडलिस्ट मधे त्यांचे पुस्तक "फडे मधूर खावया".
काय अगं! गझलकारा ना तू, जरा नीट वाच ना...
अगं पण त्या पुस्तकाचे नाव तर हेच आहे मग मी नीट म्हणजे कसं वाचू ...
विदर्भात जर हेच पुस्तकाचे नाव वाचले तर काय खायला लागेल हे सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे...
पुस्तकाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पहिल्याच प्रकरणात झाला तो असा की, लेखकाच्या मित्राला ळ ऐवजी ड उच्चारण्याची सवय होती. त्याचे नावही "फाळके" म्हणजे त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर "फा-ड-के".
लेखकाचे प्रख्यात कवीमित्र कलीम खान साहेबांना कवितेची एक ओळ सुचली मात्र पुढची ओळ काही केल्या सुचेनाच. कवितेचे डोहाळे पुरवता पुरवता प्रत्येक कवीच्या नाकी नऊ येतेच म्हणा त्याचाही प्रत्यय आपल्याला याच पुस्तकात 'जो न देखे रवी' मधे येतोच म्हणा..असो. तर दुसरी ओळ काही केल्या सुचेना. ती ओळ ऐकून व दुसरी ओळ न सुचल्याची यातना पाहून सुधाकर कदमांच्या तबलजींना ती ओळ एक झटक्यात सुचली ती वाचून मात्र कविता रचणे किती सोपे असते याचा प्रत्यय दुसऱ्याच झटक्यात आला...
त्या ओळी आहेत..
"मी काल सहाय्या गेलो समजून तिला एक अबला"...कवी- कलीम खान
"पण हाय तिच्या बापाने माझाच बडवला तबला"..दुसरं कोण ? खुद्द तबलजीच...
अशा कवींच्या जुगलबंदीने हास्याचा स्फोट न झाला तर नवलच..
अशक्त भाषेचा सशक्त वापर कसा करावा याचे पुरेपूर धडे तसेच मातृभाषेला "मदरटांग" हेही म्हटले जाऊ शकते ते ह्याच पुस्तकात... झंपर जळाले म्हणजे नेमके काय जळाले वाचताना हास्याचा कडेलोट नाही झाला तर पुस्तकाचे नावच बदलवून टाकीन...
"तराणा"... नागपूरच्या दैनिक तरूण भारत या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर डावीकडे आलेला हा लेख बाकी खासच आहे. गायक आणि राजकारणी यांची रागदारीतून गुंफण करणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे...ते एक गायक-संगीतकारच करू जाणे अर्थातच तो हाडाचा लेखक असणेही गरजेचे आहे...
नेत्यात अभिनेता आणि अभिनेत्यात नेता कसा डोकावतो हे मात्र पुस्तकात वाचूनच याचा आनंद घ्यायला हवा...
जास्त हाव केल्याने पाय गळ्यात येण्याची संभावनाच जास्त असते हे "लक्ष्मी-वेल"ने हास्यकारंजासह दाखवून दिले.
"पर्ण-पुराण" मध्ये विविध पानांचे जीवनातले सांस्कृतिक महत्त्व सांगताना सोबत त्याचा आरोग्याशी असणारा संबंध वजा करून..मावा, गुटखा, तंबाखू यांची त्यात बेरीज करत आयुष्याचे गणित कसे बिघडवत आहे याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे...
आज मुले आईबापासमोर मद्यपान करून जायला देखील मागे पुढे पाहत नाहीत पण, या पुस्तकात पिताश्रीने पान खाल्यावर खऱ्या अर्थाने कसे तोंड रंगवले हे सांगताना "जनरेशन गॅप" चा फरक अधोरेखित करताना स्वतःवर बेतलेला रंगारंग प्रसंग खूप सुंदररित्या रंगवून सांगितला आहे.
उपरी सजावटीसाठी वापरात येणाऱ्या बेगडाच्या सौंदर्याचे रहस्य, त्याच्या बेगडी पणाचा पर्दाफाश "बेगड" मधून करण्यात आला आहे. त्यातून बुवाबाजी, मुठ मारणे, भानामती यांसारख्या अंधश्रद्धेवर हल्लाबोल करत जळजळीत अंजन घालण्याचे कामही लेखकाच्या लेखणीने हसतखेळत यशस्वीरित्या मांडलेले आहे.
"नाते-खाते-गोते" यात नात्यांचे अकाउंट तर इतके चोख सांभाळले आहे की ते वाचून एखाद्या बॅक अकाउंटंटला देखील इतका चोख येईल की नाही याची शंका मनात डोकावून गेली. हसण्याचा हा चेक बाऊन्स होणार नाही याची खात्री मी देते...
"मोफतलाल" मधला लेखकाला भेटणारा मोफतलाल तर आपल्याला पावलोपावली भेटत असल्याची ग्वाही हे पुस्तक सहज देऊन जाते...
लेखकाला "हम आपके है कौन" पाहून चढलेली धुंदी, आयुष्य म्हणजे तीन तासाचा चित्रपट नव्हे हे कळताच 'दिल के अरमाँ आँसुओमे बह गए' म्हणतच उतरली. शिवाय आपल्या घरात त्या चित्रपटाप्रमाणे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याच्या नादात बायकोच्या तोंडून बापाचा उद्धार करून घेतला तो निराळाच...
त्यांच्यातील लेखकात गायक-संगीतकार कसा डोकावतो त्याचा उत्कृष्ट नमुना प्रश्न आणि उत्तर मध्ये आपल्याला पाहायला मिळते...
*मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते तशी माझी झाली*
*आता मात्र माझे सातही सूर बेसूर झाल्याचे लक्षात आले*
जीवनाकडे नेहमी गांभीर्याने न पाहता त्याचसोबत जर विनोदी अंगाने पाहिले तर जीवन समरसून जगता येईल याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक प्रकरण देऊन जाते...
पुस्तक वाचताना जीवनाचे तत्वज्ञान मांडणारे वपु तसेच पुलंचा खमंग खुसखुशीतपणा अख्या पुस्तकभर भेटत राहतो. या दोघांच्या लेखणीचा अंश एकत्रितपणे सुधाकर कदमांच्या लेखणीत जाणवत राहतो आणि हो, तुमच्यातील संगीतकारासोबतच तुमच्यातील लेखक जिवंत राहो हीच सदिच्छा आपल्याही नकळत आपले मन देऊन जाते...
'हप्ता पोहचवत' हे पुस्तक वाचण्याचे "सौजन्य" प्रत्येकजण दाखवणार याची खात्री लेखकासह मलाही आहेच त्याबद्दल मी नादच करणार नाही."विषयांतर" सारखेच विषयांतर न करता तुमच्या नव्या पुस्तकाच्या प्रतिक्षेत...
-चंदना सोमाणी © पुणे
●लेखक - सुधाकर कदम ●
प्रकाशक - अक्षर मानव प्रकाशन, पुणे.
किंमत-पोस्टेज खर्चासह २००₹
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी
8888858850
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
कितनी बातें...
कितनी बातें... हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...
-
गझल - सांजवेळी ही उदासी काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम...
-
मराठी गझल - प्रश्न हजारो घुटमळलेले प्रश्न हजारो अन् दबलेले प्रश्न हजारो याला सुद्धा, त्याला सुद्धा सतावलेले प्रश्न हजारो नवीन कोडी सोडवत...
-
गझल - कोणती विराणी अंधार या मनाचा की कोणती विराणी मी आळवीत आहे गाणी उदासवाणी वाटे मनास माझ्या येथून दूर जावे आभाळ मागते हे फिरुनी पुन्हा न...








