गझल - त्याला
झोपडी तर फक्त ती आधार त्याला
पावसा केले उगी बेजार त्याला
भाकरी डोळ्यात दिसते लेकरांच्या
तीच तर करते किती लाचार त्याला
तो अताशा भीत नाही संकटांना
वादळांनी बनवले झुंजार त्याला
वेस ओलांडून आला आत वारा
आठवे ते आजही घरदार त्याला
माणसे उरलीच कोठे पण तरीही
भेटणारे भेटती दिलदार त्याला
लाख त्याने जमवला गोतावळा पण
शेवटी कामास आले चार त्याला
जो प्रसंगी देत गेला सर्व काही
कोण देते ते पुन्हा साभार त्याला
चंदना सोमाणी ©®

मानवी जीवनाची गाथा सांगणारा प्रत्येक शेर अफलातून..........👌👌👌❤️
ReplyDelete