*रसग्रहण*
*सौ. सविता सामंत*
*गोवा*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
चला तर आपण आजच्या रसग्रहणाकडे वळूया!!
आदरणीय गझलकारा सौ.चंदनाताई सोमाणी यांची व्योमगंगा वृत्तातली एक दमदार गझल आणि तिचे रसगग्रहण यांचा आस्वाद घेऊया!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*मतला* -0️⃣1️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*मन चिंती ते वैरी न चिंती*
या उक्तीनुसार मानवी मन हे अनाकलनीय आणि गूढ आहे. कधी कधी दोन व्यक्ती खूप जवळचे मित्र असतात.पण काही तात्विक वादांमुळे कटुता निर्माण होते. आता यात दोघांना किंवा कुणा एकट्याला जरी वाटले की आत्ता मला त्याच्याशी बोलायचं आहे.पण मग मनात विचार येतो की वादामुळे आधीच मनात कटुता आहे. मी परत बोलल्याने जर ती कटुता आणखीनच वाढली तर!....असा विचार करून त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट आपल्या प्रिय व्यक्तीला सांगताही येत नाही.
एकमेकांना एकमेकांची सवय झालेली असते. दोन मित्र असो मैत्रिणी असोत वा प्रियकर-प्रेयसी...! छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी बोलण्याची सवय असते. एखादी नविन गोष्ट आवडली.नविन गोष्ट पाहिली तर ती कधी एकदा त्याला किंवा तिला सांगेन अशी मनाची अवस्था होते. आणि मग अशा स्थितीत ती गोष्ट मनात कोंडून ठेवावी लागते.मग मनाची तगमग, मनाची अस्वस्थता वाढते. या मनाच्या अवस्थेत *धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं* ही उक्ती लागू होते. अश्या मनाच्या अवस्थेचं नेमकं वर्णन गझलकारांनी केलं आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣2️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣3️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*काल मी माझ्या सर्व मैत्रिणींना भेटले खूप धमाल केली*
*शेर* -0️⃣4️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे*
या उक्तीप्रमाणे एका वाक्यात प्रस्तुत शेराचा आशय आहे. स्त्रीला तिच्या जीवनात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.त्यात महत्वाच्या दोन भूमिका म्हणजे पत्नी किंवा प्रेयसी आणि दुसरी आई! आपल्या सहचराबरोबर पत्नीचं नातं ती सुरूवातीला जेवढे समरसून निभावते तेवढं ती आई झाल्यावर निभावू शकत नाही.माया, जिव्हाळा हा स्त्रीचा स्थायीभाव आहे.आई-बाळाचं नातं जगातील सर्वात नि:स्वार्थी नातं आहे. ज्याला नऊ महिने उदरात मायेने वाढवलं आहे, तो बाळ हा आईचाच एक भाग आहे.इतके दिवस बाळाशी तिचा मूक संवाद होता. ती आई झाल्यावर तिचं जास्तीत जास्त लक्ष,तिचा ओढा आणि तिचं ममत्व हे साहजिकच बाळाकडे आहे.
या शेरात गझलकारांनी याची प्रांजळपणे कबुली दिली आहे, की मी एक बाई असले तरी, आईची भूमिका मला नात्याच्या बाबतीत अधिक श्रीमंत करते. ही भूमिका आता मी अधिक तन्मयतेने निभावते आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣5️⃣
आनंदाचे,सुखाचे जे प्रसंग आपल्या जीवनात येतात, कालांतराने त्या रम्य आठवणी बनून मनात घर करतात. कधी निवांत वेळी सारे प्रसंग डोळ्यासमोर तरळतात.किंबहुना त्या गोड आठवणींना उजाळा देणं ही मानवी मनासाठी त्या प्रसंगाइतकंच आनंददायी असतं. त्या सुखाच्या प्रसंगातील नेमका कोणता क्षण मला सुखी करुन गेला...!आधीचा क्षण चांगला होता की नंतरचा चांगला होता याचा शोध घेण्याचा मनाला छंदच जडतो. पण नेमका कोणता क्षण चांगला वाटला हे सापडत नाही.
आनंदात आणि सुखातही माणसाची तुलना करण्याची सवय काही संपत नाही. मानवी मन सुखाचा पुर्नप्रत्यय आठवणीतून घेत असतं....पण त्यातही अधिक सुखाचा शोध चालू असतो!!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣6️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सण किंवा उत्सव पर्व हे आपल्यासाठी आनंदाने क्षण घेऊन येतात. पण आनंद आणि सुख घेऊन येणाऱ्या क्षणांनाही आपण उत्सव पर्व का म्हणू नये? आनंद ओसरल्यावर आनंदी क्षण निघून गेले तरी मन मात्र त्या क्षणांभोवती रेंगाळत असतं.
पण हे झालं सामान्य माणसांविषयी. विशिष्ट ध्येयाने प्रेरीत माणसे त्या क्षणांमध्ये काही क्षण रमतात. पुन्हा आपल्या ध्येयपथावर चालायला सुरुवात करतात.
काळाची पावले ओळखून काळाच्या किनाऱ्यावर आपलं नाव कोरणारी माणसं, कितीही आनंदाचे क्षण असले तरी भुलून जात नाही. त्यांचे प्रयत्न सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरूच असतात. जगाच्या कल्याणासाठी आगळं वेगळं काम करत असतात. लोकहिताचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सैनिक, शास्त्रज्ञ, नर्स, डाॅक्टर, समाजसेवक अंतराळवीर.....ही काही उदाहरणे आहेत.अशा अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतात.....अविरतपणे.....न थांबता!!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* - 0️⃣7️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️
तुला कधीतरी कळेल का...तुझ्या बोलण्याने माझ्या मनावर किती घाव करत असतोस. मी तुझ्याकडून नेहमीच प्रेमाची आणि सरळ बोलण्याची साधी अपेक्षा करत आले. पण तुला मात्र माझी एवढी माफक अपेक्षा पूर्ण करता आली नाही.
तू सदोदीत उपेक्षा करत आलास. तुझ्या निष्काळजी वागण्या बोलण्याने मनावर रोज नविन घाव करत आलास. आता या मनावर जखमांचे अनेक चरे पडले आहेत.हे काही आजचं नाही.हे तुझं रोजचंच आहे. आता मनाला वेदनेची आणि जखमांची इतकी सवय झाली आहेकी त्यांची मोजदाद करणेही मला कठीण झाले आहे.
सहजीवनात पती -पत्नी दोघांनी एकमेकांचा आदर करावा.एकमेकांना वेळ द्यावा.भावना जाणून घ्यावा.मतांचा आदर करावा.या सर्वांच्याच अपेक्षा असतात.
आजची स्त्री घरदार,नोकरी-धंदा, मुलांचं संगोपन, कुटुंबातील सर्वांची
काळजी या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळते, तेव्हा पुरुषाने... पतीने तिला या सर्व गोष्टीत सहाय्य करायलाच हवे.
हे करताना तिचे मनही जपायला हवे.ती आपलं घर सोडून आली आहे आणि या घराला ती आपलं समजून सतत कार्यशील राहाते आहे, याची जाणीव घरातील प्रत्येकाला असायला हवी, पण पतीला ही जाणीव अधिक दृढतेने असायला हवी.तरच दोघांतील विश्वासाचं नातं अधिक घट्ट आणि समृद्ध होईल....खरं ना!!
या गझलेतील मला उलगडलेला आशय मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.या गझलेतील आशयसौंदर्य हे पूर्णपणे गझलकारांचे आहे.
धन्यवाद!🙏🏻
दि. 26/01/20

No comments:
Post a Comment