भिजवतात पापण्या चांदण्यातल्या सरी
पंख छाटले तरी... विहरतात भावना
जाहल्या खुल्या दिशा त्या नभातल्या परी
घाव घातलेत हे सांग वादळा कुणी
की उगीच जाणवे काळजातल्या घरी
पूर ओसरेच ना... दाटल्या उरी नद्या
आसवात डुंबल्या सागरातल्या भरी
मोक्ष लाभतो कसा काकस्पर्श दाउनी
फक्त रागवू नको वाद घातल्यावरी
झोपलास काय तू वेद वाचुनी तुझे
जागशील रे कधी देवळातल्या हरी
चंदना सोमाणी ©®

#तुझ्या गझल नेहमीच सुपर से डूपर उपर असतात..........गझल सम्राज्ञी ❤️ 😘 ❣️😘
ReplyDeleteअप्रतिम 💐💐🎊🎊
ReplyDelete