Followers

Thursday, 18 July 2024

मराठी गझल - प्रश्न हजारो

मराठी गझल - प्रश्न हजारो 

घुटमळलेले प्रश्न हजारो 
अन् दबलेले प्रश्न हजारो

याला सुद्धा, त्याला सुद्धा 
सतावलेले प्रश्न हजारो 

नवीन कोडी सोडवताना
उलगडलेले प्रश्न हजारो

अडकित्त्याच्या मधे सुपारी 
अवघडलेले प्रश्न हजारो

अन्यायाच्या वाटेवरती
थरथरलेले प्रश्न हजारो

पुन्हा भेटले नव्या दमाने 
भरकटलेले प्रश्न हजारो

एकाचेही उत्तर नाही
गोंधळलेले प्रश्न हजारो

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. कालातीत....🙏
    छोटी बहर मोठा कहर....असंख्य प्रश्नांची उत्तरे कायम अनुत्तरितच राहणार तरीही गझल दमदार तेवढ्याच ताकदीची नेहमीप्रमाणेच...
    गझल सम्राज्ञी जिओ जिओ.. जिओ चंदना ❤️❤️

    ReplyDelete
  2. खूप छान!

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...