Followers

Sunday, 31 March 2024

चंदनाची फुले रसग्रहण - 15

 शब्दफुलांची चंदनमय दरवळ


 
रसग्रहण - संजय खोत 

केवळ अप्रतिम मॅम आपला 'चंदनाची फुले' गझल/काव्यसंग्रह..!

एकाहून एक सरस रचनांचा सुरेख संगम अन् डिसेंबर महिन्यातच बहरणाऱ्या या फुलांची दरवळ 

प्रत्येक शब्दांतून गंध वाटून जाते...!

 योगायोगाने २४ डिसेंबर याच दिवशी माझ्या हाती हा संग्रह आला.. कालच मी बऱ्याच रचनांचा आनंद घेतला.. सर्व रचना अफलातून आहेतच.. आवर्जून वेगवेगळ्या वृत्तातल्या गझल.... अक्षरांचा लळा, फिर्याद, कोरडे क्षण, रंग माणसाचे, जिंदगी, सुद्धा वाटतो आता नकोसा, लेखणीचा रंग, कोंडमारा, फारसे, काही केल्या या व इतर बऱ्याच रचनांनी वन्समोअर वाचायला भाग पाडलेच..!

 आपलं शब्दावरील प्रेम प्रत्येक रचनांमधून ओसांडून वाहिलंय....! खूप दिवसांनी एक सुंदर काव्य/गझल संग्रह वाचायला मिळाला..🙏🙏

 अशीच आपल्या शब्दफुलांची चंदनमय दरवळ यापुढे पसरत राहो हीच सदिच्छा..🌷🌷

अन् आपला संपूर्ण गझल संग्रह आम्हा रसिकांसाठी लवकरात लवकर प्रकाशित व्हावा हीच इच्छा...!!

                         धन्यवाद 🙏🙏

                      - संजय खोत

मराठी गझल - कुठून आणू

गझल - कुठून आणू

हळूच श्रावण निघून गेला ॠतू नवाबी कुठून आणू
नसेल जर का फुले गुलाबी धरा गुलाबी कुठून आणू

तुझा अबोला, तुझा दुरावा... तुझ्यातले गुंतणे असेही
तुझ्या विना मी तुझ्या मिठीची नशा शराबी कुठून आणू

फुलून आल्या अबोल जखमा, उदास झाली फुले जुईची
मलाच मी भेटण्यास आता नवीन बाबी कुठून आणू

खुल्या नभाचे खुले इशारे खुणावती का क्षणाक्षणाला 
कळूनही अक्षरे कळेना लिपी किताबी कुठून आणू

जिथे उन्हाळा रुसून गेला पळस तिथे मग कसा फुलावा
तुला मला जो हवाहवासा विरह रुबाबी कुठून आणू

चंदना सोमाणी ©®
 

Friday, 29 March 2024

मराठी गझल - गझल म्हणाली

 गझल - गझल म्हणाली 

थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा

जीवन आहे अगम्य कोडे
कसा सोडवू प्रयास माझा

वाढत गेला गुंता नुसता
ऋतू चालला उदास माझा

विवंचना ही कुणास सांगू
माझ्यापुरता समास माझा

उगा कशाला व्यथा बाळगू
हवाय पत्ता सुखास माझा

गझल म्हणाली मला चंदना 
तुझ्यात आहे निवास माझा 

चंदना सोमाणी ©®

Sunday, 24 March 2024

चार ओळी -1


 चेहऱ्या मागचा चेहरा 
जेव्हा देऊ लागतो अंतर
नको वाटू लागते तेव्हा
तुझी रुक्ष फुंकर

चंदना सोमाणी ©®

तन्हाईयाँ...

 तन्हाईयाँ...

फिर याद दिलाती हैं तन्हाईयाँ
हर वक़्त सताती हैं तन्हाईयाँ

ये रातें, और महकती सी बातें
क्या ख़्वाब सजाती हैं तन्हाईयाँ

तब साथ निभाती थी आहट तेरी
अब साथ निभाती हैं तन्हाईयाँ

ना जाने किस हक़ से आ जाती हैं
शब भर तड़पाती हैं तन्हाईयाँ

यादों, लम्हों, अश्क़ों के ये मोती
क्या ख़ूब लुटाती हैं तन्हाईयाँ

 चंदना सोमाणी ©®

 

Thursday, 21 March 2024

रंग ग़ज़ल का निखरा है...

रंग ग़ज़ल का निखरा है

ऊपर ऊपर बिखरा है
अंदर अंदर गहरा है

तुमसे बातें करने को
चांद जमीं पे उतरा है

मुझ तक उसको आना था
मुझ तक आकर ठहरा है

ढलती जाए साँझ वहां
वक़्त ने बांधा सेहरा है 

हल्का हल्का धुॅंधला सा
आखोंमे क्यू बदरा है 

हर धुन मेरी सजती है
रंग ग़ज़ल का निखरा है 

चंदना सोमाणी ©®
 

मराठी गझल - शब्दमैफील

गझल - शब्दमैफील


तुझी आठवण गंध माळून यावी
जशी रातराणी फुलारून यावी

अशी दूर व्हावी निराशा मनाची
जशी ज्योत अंधार भेदून यावी

फुलावे असे क्षण तुझ्या सोबतीने
जशी चांदणी रात उजळून यावी

रुजावे असे गीत ओठी तुझ्या की
जशी शब्द मैफील रंगून यावी

अशी चंदनाने लिहावी गझल की
जशी स्वप्न कक्षेस लांघून यावी 

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - तमा बाळगावी

गझल - तमा बाळगावी 

तमा बाळगावी कुणाची कशाला
भरवसाच आहे कुठे या जगाला

विखारी सुखाचा जरा दंश झाला
ठरे व्यर्थ येथे जगाचा हवाला

कशी ओढ नाही धरेची नभाला
म्हणावे तरी काय ह्या पावसाला

सुखाकारणे त्यागतो मायबापा
कसा धाडतो पुत्र वृद्धाश्रमाला

घरातील भेदी म्हणे सोयऱ्याला
जशी जाळते वात ही कापसाला

क्षुधा पावसाची कशी ही शमेना
जगावे कसे कोरड्या या क्षणाला

कितीही जरी यत्न केला तरीही
सहाणेविना गंध ना चंदनाला

चंदना सोमाणी ©®

Monday, 18 March 2024

सगळं आऊट डेटेड झालंय...

संपादक - संतोष थोरहाते

सगळं आऊटडेटेड झालंय...

आई! काय गं रेडीओ ऐकत असतेस , ते आता आऊटडेटेड झालंय. काय ती जुनी बोअरींग गाणी ऐकत असतेस सदा न कदा...
कृष्णाई अगं मला आवडतात ती,, तू ऐक ना तुला हवी ती.. मी अडवलं का तुला?
बरं! जरा आवाज कमी केला तर बरं होईल मी शिवानीशी बोलत आहे...
आणि बोलता बोलता रूमकडे निघून गेली.. यमुनामावशी झाडलोट करताकरता कृष्णाईच्या रूमकडे वळली आणि तिच्या कानावर शब्द पडले तीचे..
अगं, काय म्हणतेस काय! तुझी आई घरातली सर्व कामे स्वतःच करते आणि चक्क तू मदत करतेस. मी नाही बाबा ही सर्व कामे करणार कधीच. दारापुढे रांगोळी काय, भांडी काय, झाडलोट काय... पैसे मोजले की सर्व कामे होतात, आमच्या इथे आहेत कामवाल्या बाया या कामांसाठी  आपल्याला नाही जमणार हे सारं.. मी नाही हात लावणार आऊटडेटेड कामांना आणि काय तू...यमुनामावशीने हे सर्व ऐकले पण चकार शब्द न बोलता त्या पुढे निघून गेल्या.. 
मैत्रिणीशी गप्पा संपवून बाहेर पडल्यापडल्या डायनिंग टेबलावरचा मेनू पाहून आईवर पुन्हा वीज कडाडली.. हे काय जेवण झाले, मला कंटाळा आलाय हे रोजचं जेवण पाहून, मी मस्त पिझ्झा ऑर्डर करते... 
अगं, कृष्णाई घरचं जेवण साधं असलं तरी सात्विक आणि पौष्टिक असतं बाळा.. बाळ ऐकेल तर शपथ...
कसं होईल या पोरीचं कोण जाणे...
आणि अचानक एक दिवस जग थांबले... लाॅकडाऊन... कोरोनाच्या एका विषाणूने अख्या जगाला थांबायला भाग पाडले...
आणि काळाचे चक्र फिरले...
आता यमुनामावशी येणार नव्हत्या हे नव्याने सांगायला नको, पण जातांना "  आऊटडेटेड झालेली कामं तुम्ही नव्याने करा कृष्णाई ताई" हे; सांगायला अजिबात विसरल्या नाही, " त्यावेळी कृष्णाईचा चेहरा मात्र बघण्यासारखा होता. आपण सहज बोलून जातो पण समोरच्याच्या मनाला काय वाटत असेल याचा जराही विचार न करता...
हाॅटेल्स, डाॅमिनोस, कॅफेज बंद...आईच्या हातच्या जेवणाशिवाय पर्याय होताच कुठे... 
शिवाय शाळा,कॉलेज बंद, सिनेमा, नाट्यगृह बंद... आईचा रेडिओ मात्र सुरूच होता...
सर्वांची कामे क्षणार्धात थांबली, तरी
सर्व गोष्टींना ऑनलाईन पर्याय होते पण, डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि  जगाचा पोशिंदा त्यांची ऑफलाईन ट्युटी निभावात होते. त्यांना मात्र कुठलाही ऑनलाईन ट्युटीचा पर्याय उपलब्ध नव्हता..
ज्या कामाला हात लावणार नाही, वेळ जात नसल्याने तीच आऊटडेटेड काम मदतीला धावून आली...
नमस्कार काय ? हाय हॅलोचा काळ असताना, हात मिळवणे, गळ्यात गळे घालून भेटणे ही फॅशन असू शकते काळाची पण संस्कृती नाही...
हे आऊटडेटेड झालंय ते आऊटडेटेड झालंय, आपण आपली विसरत चाललेली संस्कृती शिकवण्यासाठीच हा काळ आला होता असं समजू या का...?
जी कधीच आऊटडेटेड होत नाही... नाही का ????

चंदना सोमाणी ©® पुणे

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

माननीय संपादक संतोष थोरहाते सरांचे मनापासून आभार 🙏💐

मराठी गझल - कुणास ठावुक


Calligraphy by- SR ROHI 

गझल - कुणास ठावुक

काय कसे अन् कुणास ठावुक
माझे माझ्या मनास ठावुक

आभाळाला दुःख कशाचे
कोसळणाऱ्या ढगास ठावुक

वरवरचे ते रूप साजिरे
खरे काय ते क्षणास ठावुक

अल्प आयुचे दुःख किती ते
पर्ण फुलांच्या दलास ठावुक

दंश जाहला सर्वांगाला
दाहकता त्या फुलास ठावुक

फक्त दिखावा नम्रपणाचा
किती मीपणा स्वतःस ठावुक

सावलीसही किती मोल ते
उन्हाळलेल्या जिवास ठावुक

म्हणतो आपण स्वर्गच गाठू
खरे कि खोटे सुतास ठावुक

चंदना सोमाणी ©®

Sunday, 17 March 2024

मराठी गझल - शब्दांनाही सूर भेटता

 

गझल - शब्दांनाही सूर भेटता

शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे
दुःख असे का हसून जाते मधून केविलवाणे

मला भेटण्या दूर दूरवर येती वादळवाटा
या वाटांवर कोण फेकते सुखदुःखाचे नाणे

राधा राधा म्हणता-म्हणता शामच हरवत गेला
पावरीत मग कोण फुंकते कुठले विरहतराणे

साध्यासोप्या जीवनातल्या साध्यासोप्या गोष्टी
वळणावरती तरी भेटती काही दीडशहाणे

आसुसलेला ढग एखादा गडगडतो, बावरतो
पाउस पडतो तेव्हा पिकते चोचीमधले दाणे

सूर्यालाही कोण विझवितो रात्ररात्रभर सांगा
काळोखाला भेटण्यासही असेल कोण दिवाणे

चंदना सोमाणी ©®

Saturday, 16 March 2024

मराठी गझल - शेवटी तोही अचानक

गझल - शेवटी तोही अचानक

जीव घेतो क्षण स्वतःचा शेवटी तोही अचानक
निखळतो तारा मनाचा शेवटी तोही अचानक

जन्मल्यापासून आहे मी कवडसा जर उन्हाचा
शोध घेऊ मग कुणाचा शेवटी तोही अचानक

प्रश्न हा उरलाच शेवट चार भिंती अन् घराचा
वाटला ना हाच साचा शेवटी तोही अचानक

मी जरा तडजोड केली सांजवेळी सावलीशी
तोल गेला का उन्हाचा शेवटी तोही अचानक

वाट ही माझी अडवली अन् मला अंदाज आला
चेहरा दिसला जगाचा शेवटी तोही अचानक

कोणता हा खेळ आहे खेळतो जो जीवना तू
त्रास होतो माणसाचा शेवटी तोही अचानक

दोष का हा पावलाला तोल जातो जर मनाचा
हाच कावा प्राक्तनाचा शेवटी तोही अचानक

चंदना सोमाणी ©®

कुछ अनजानी सी...

कुछ अनजानी सी...

कुछ अनजानी सी लगती है वो हमें
कि जिंदगानी सी लगती है वो हमें

क्या कहकर बरसती हैं फ़िर से बुंदे
एक कहानी सी लगती है वो हमें

ये यादें हैं या फ़िर हुजूमे मेहमान
आनी जानी सी लगती है वो हमें

ता उम्र जो बेगानी सी लग रहीं थीं
अब पहचानी सी लगती है वो हमें

जिंदगी गर धुआं नहीं है तो क्या है
फ़िर बेमानी सी लगती है वो हमें

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - फिर्याद

गझल - फिर्याद

अवेळी कशी ही तुझी साद आली
तुला आज माझी कशी याद आली 

तुझ्या कंकणांचा असा नाद झाला
मनाला मनाची जशी दाद आली

तुझ्या आठवांचा असा घोर माथी
नशीबी दिवाळीच बरबाद आली

पुन्हा जीव घेईल बघ सांजवारा
असे वाटते की जणू ब्याद आली

पुन्हा भेटली ती युगे लोटल्यावर
छळावे किती हीच फिर्याद आली

चंदना सोमाणी ©®

 

Friday, 15 March 2024

चंदनाची फुले - रसग्रहण 14

मनाच्या निर्मळ पणाची ग्वाही देणारा...

रसग्रहण - सुरेश बोर्डे 

एखाद्या साहित्य कलाकृतीला प्रथितयश लेखक समीक्षकांची प्रतिक्रिया बहुमोलाची असते तो बहुमान सामान्य वाचकांपर्यंत पोहोचल्याची पावती असते परंतु सामान्य रसिकांची कलाकृती विषयीची भावना कवी लेखकापर्यंत पोहचली तर रसिकांचा ही आनंद व्दिगुणित होतो असा पुर्नआनंद मिळावा या हेतुने गझलकारा कवियित्री चंदना सोमाणी यांच्या "चंदनाची फुले" या नव्या गझल कविता संग्रहाचा रसास्वाद. 

        "चंदनाची फुले" हा चंदना सोमाणी यांचा ८० पानी गझल कवितांचा संग्रह गझल प्रांतात नाव लौकिक असल्याचे गझलकारा या संग्रहातून सार्थ ठरवतात.

"पाकळी पाकळी शब्दवेडी कळी
  सांडते शायरी चंदनाची फुले"

हा शेर वाचकाला ओंजळीत ओतप्रोत गझल फुले देणार आहे असे आश्वस्त करतो आणि पुस्तक भर वाचण्यास खुणावत रहातो.  
फुलांची सुखाची अपेक्षा कोणाला नसते? त्यासाठीच तर सारी धडपड पण ते सहज शक्य आहे का? या वास्तवाचं भान गझलकारा सजगतेने व्यक्त करतात 

"किती साचले दुःख हृदयी नभाच्या
  कशा आसवांच्या निथळतात धारा"

वेदनेची जाणिवप्रगल्भतेने व्यक्त करणारा हा खयाल वाचकाला गझल कडे अधिक आकृष्ट करतो. मात्र दु:ख म्हणजेच आयुष्य नाही ही निरस भावना आयुष्य ठरू नये, जगणे सुंदर आहे अशी साद देणारा शेर तितक्याच ताकदीने गझलकारा आपल्या समोर पेश करतात... 

"अशी दूर व्हावी निराशा मनाची
  जशी ज्योत अंधार भेदून यावी"

जगण्याची उर्मी, सकारात्मकता या साऱ्याला आवाहन केले जणू. तरीही माणूस साधा सोपा मार्ग सोडून अव्यक्त मार्ग का शोधीत रहातो हे गुढाचे आकर्षण की स्वभाव धर्म? यावर सुंदर शेर 

"माणूस माणसाचा हे का कुणा कळेना
  संकल्पना सुखाची सोपीच पण रुजेना" 

मन तुटते स्वाभिमान जागा होतो गत आयुष्याची आठवण एक दिनचर्या होते आणि तो भाव गझलकारा शब्दात अचूक व्यक्त करतात 

"तुझ्या आठवांचा असा घोर माथी
  नशीबी दिवाळीच बरबाद आली" 

मनातील सल अत्यंत संयमितपणे व्यक्त करतात. खरे तर ओढ समर्पण सर्वश्रेष्ठ, जगण्याचा बंध खुला होतो निसर्गाला दानही तेच मागायचं असतं पण निसर्ग रुसला असेल तर---तर---गझलकारा अप्रतिम शब्दबद्ध करतात 

"कशी ओढ नाही धरेची नभाला
  म्हणावे तरी काय ह्या पावसाला"

इच्छा आपली असली तरी प्रतिसादही महत्वाचा तसा न भेटणं हे अधिकच क्लेशकारक, सांगता ही येत नाही आणि व्यक्त होणे हे कठीणच, पण तेच अगदी सोप्या पण मार्मिकतेने सांगणारा हा शेर 

"विवंचना ही कुणास सांगू
  माझ्या पुरता समास माझा"

मनाच्या निर्मळ पणाची ग्वाही देणारा पण इतराला सांगूनही अपेक्षा ठेवता येईल का कारण हा शेर जगण्याचे इंगित सांगून जातो 

"चुटकी सरशी रंग बदलतो
  तो जगण्याचे ढंग बदलतो"

"तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा
  टपोऱ्या दवांचा पुन्हा पावसाळा"

या सर्वांग सुंदर गझलेने जगण्यातील समृध्दी उन-पावसाचा खेळ, मनाला नवी ऊर्जा देते आणि तरीही मनाची कासाविसी थांबत नाही कारण

"कोंडमारा होत आहे हा किती
  वादळी अंधार आहे जिंदगी" 

मनाचे सारे कंगोरे ,वेदनेचे सुख, सुखाची वेदना आणि दखल न घेणारा भवताल या साऱ्यांना मार्मिकतेने चित्रण करून जातात . आणि स्त्रीच्या वैश्विक दु:खाची आळवणी समर्थन करतात 

"कधी उंबरा जो न ओलांडला, त्या
 लुळ्या पावलांचा किती कोंडमारा"

दु:खाचे असे घाव सहन करतांना सावरायला कोणी नसते तेही एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीसाठी करायचे हा शेर त्याचा प्रत्यय देतो 

"मनास माझ्या ठेच लागुनी मी कोसळता
  सावरणारी आई बनते तुझी आठवण"


      शेवटी माणसातील मी पणाचा ऱ्हास व्हावा या सदहेतुचा शेर नोंदवल्या शिवाय लेखन सीमा करणे अशक्य आहे 

"चौकट होती अभिमानाची पार करू ना शकलो आपण
 असे कितीसे दोघांमधले क्षितिजा इतके अंतर होते"

चंदनाची फुले मनातील भावविश्वाला साद घालणारा एक अप्रतिम गझल संग्रह वाचल्याचे समाधान मिळते 
                      
 सुरेश बोर्डे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🌷🌷

Thursday, 14 March 2024

क्यो है...

क्यो है...

हर जुबां पर एक कहानी क्यों है
जो बह ना जाए वहीं पानी क्यों है

जहां तुम्हारे कदम पीछे हट गए
उसी मोड़ पे आज रवानी क्यों है

कोई माहताब नहीं है शहर में
फिर भी रात इतनी सुहानी क्यों है

ये दिवानगी हमें रुला दे फिर से
ये कहानी इतनी रुहानी क्यों है

हमसे सिर्फ़ ज़ख़्म ही मिलें गर उन्हें
बेमतलब युहीं मेहरबानी क्यों है

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - अन् बहाव्याची फुले..

गझल - अन् बहाव्याची फुले

ही उन्हे माझी तरी भाळू कशी 
अन् बहाव्याची फुले टाळू कशी

दोन डोळ्यांसारखे ना भेटले 
सुख असो की दुःख कवटाळू कशी

वेदना जर देत गेली वेदना 
आसवे कोणा पुढे ढाळू कशी

साथ त्याने जन्मभर नाही दिली
एकटी वचने कशी पाळू कशी

माहिती आहे मला माझीच ती 
पण व्यथेची माळ मी माळू कशी

सोसली आजन्म ज्याने काहिली 
ती उन्हे मी आज सांभाळू कशी

हीच चिंता सोबतीला शेवटी 
ही चिता माझी मला जाळू कशी

चंदना सोमाणी ©®
 

Sunday, 10 March 2024

मराठी गझल - हे न थोडे थोडके

                   
गझल - हे न थोडे थोडके 

वेदनेला फूल आले हे न थोडे थोडके 
त्यासही अत्तर म्हणाले हे न थोडे थोडके

ठेवली साखर जिभेवर गोड इतके बोलणे
शब्द नाही होत भाले हे न थोडे थोडके

आरसा मी पाहिला मग चंद्र सुचला, अन् पुढे
आरशांचे चंद्र झाले हे न थोडे थोडके

कापल्यावर पंख माझे ते म्हणाले उड जरा
बंधने होती, उडाले हे न थोडे थोडके

एक आशावाद होता दोन बोटांच्या मधे
जे हवे होते मिळाले हे न थोडे थोडके

चंदना सोमाणी ©®

Thursday, 7 March 2024

मराठी गझल - किती साठवावे

मराठी गझल - किती साठवावे

किती साठवावे जसेच्या तसे
तुझ्या आठवांचे गुलाबी ठसे

खरे वाटले ना कुणाला जुने
नवे वाटते आजही बघ कसे

जरा लाजुनी मी तुला पाहता
कशी गोड गाली खळीही हसे

नभी दूरवर पसरले चांदणे
जसे या मनावर तुझे कवडसे

नको ना करू तू वृथा काळजी
तुझी जाण या पावसाला नसे

चंदना सोमाणी ©®

Monday, 4 March 2024

प्रवास...



कुठून आली कुठे निघाली, दिवाणीच ती मला भासली
सोबत असुनी सोबत नाही, अशी कशी ना मला समजली

कोण कुणाची करतो चिंता, कधी कुणाला इथे समजते
जे होते ते भल्याचसाठी, म्हणून बघ ती किती हासली

सोडुन बघ ती मला निघाली, मला वाटली माझी होती
माझ्या पुरती, माझ्यासाठी, या दुनियेची नदी आटली

रडले होते सारे सारे, खरे कि खोटे माहित नाही
काळ वेळ ही निघून गेली, काळाची ना गती थांबली

खोटा होता जन्मच इथला, खोटी होती नाती सारी
माझी होती मला वाटली, जिंदगीच जी मला भेटली

चंदना सोमाणी ©®
 

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...