संपादक - संतोष थोरहाते
सगळं आऊटडेटेड झालंय...
आई! काय गं रेडीओ ऐकत असतेस , ते आता आऊटडेटेड झालंय. काय ती जुनी बोअरींग गाणी ऐकत असतेस सदा न कदा...
कृष्णाई अगं मला आवडतात ती,, तू ऐक ना तुला हवी ती.. मी अडवलं का तुला?
बरं! जरा आवाज कमी केला तर बरं होईल मी शिवानीशी बोलत आहे...
आणि बोलता बोलता रूमकडे निघून गेली.. यमुनामावशी झाडलोट करताकरता कृष्णाईच्या रूमकडे वळली आणि तिच्या कानावर शब्द पडले तीचे..
अगं, काय म्हणतेस काय! तुझी आई घरातली सर्व कामे स्वतःच करते आणि चक्क तू मदत करतेस. मी नाही बाबा ही सर्व कामे करणार कधीच. दारापुढे रांगोळी काय, भांडी काय, झाडलोट काय... पैसे मोजले की सर्व कामे होतात, आमच्या इथे आहेत कामवाल्या बाया या कामांसाठी आपल्याला नाही जमणार हे सारं.. मी नाही हात लावणार आऊटडेटेड कामांना आणि काय तू...यमुनामावशीने हे सर्व ऐकले पण चकार शब्द न बोलता त्या पुढे निघून गेल्या..
मैत्रिणीशी गप्पा संपवून बाहेर पडल्यापडल्या डायनिंग टेबलावरचा मेनू पाहून आईवर पुन्हा वीज कडाडली.. हे काय जेवण झाले, मला कंटाळा आलाय हे रोजचं जेवण पाहून, मी मस्त पिझ्झा ऑर्डर करते...
अगं, कृष्णाई घरचं जेवण साधं असलं तरी सात्विक आणि पौष्टिक असतं बाळा.. बाळ ऐकेल तर शपथ...
कसं होईल या पोरीचं कोण जाणे...
आणि अचानक एक दिवस जग थांबले... लाॅकडाऊन... कोरोनाच्या एका विषाणूने अख्या जगाला थांबायला भाग पाडले...
आणि काळाचे चक्र फिरले...
आता यमुनामावशी येणार नव्हत्या हे नव्याने सांगायला नको, पण जातांना " आऊटडेटेड झालेली कामं तुम्ही नव्याने करा कृष्णाई ताई" हे; सांगायला अजिबात विसरल्या नाही, " त्यावेळी कृष्णाईचा चेहरा मात्र बघण्यासारखा होता. आपण सहज बोलून जातो पण समोरच्याच्या मनाला काय वाटत असेल याचा जराही विचार न करता...
हाॅटेल्स, डाॅमिनोस, कॅफेज बंद...आईच्या हातच्या जेवणाशिवाय पर्याय होताच कुठे...
शिवाय शाळा,कॉलेज बंद, सिनेमा, नाट्यगृह बंद... आईचा रेडिओ मात्र सुरूच होता...
सर्वांची कामे क्षणार्धात थांबली, तरी
सर्व गोष्टींना ऑनलाईन पर्याय होते पण, डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि जगाचा पोशिंदा त्यांची ऑफलाईन ट्युटी निभावात होते. त्यांना मात्र कुठलाही ऑनलाईन ट्युटीचा पर्याय उपलब्ध नव्हता..
ज्या कामाला हात लावणार नाही, वेळ जात नसल्याने तीच आऊटडेटेड काम मदतीला धावून आली...
नमस्कार काय ? हाय हॅलोचा काळ असताना, हात मिळवणे, गळ्यात गळे घालून भेटणे ही फॅशन असू शकते काळाची पण संस्कृती नाही...
हे आऊटडेटेड झालंय ते आऊटडेटेड झालंय, आपण आपली विसरत चाललेली संस्कृती शिकवण्यासाठीच हा काळ आला होता असं समजू या का...?
जी कधीच आऊटडेटेड होत नाही... नाही का ????
चंदना सोमाणी ©® पुणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
माननीय संपादक संतोष थोरहाते सरांचे मनापासून आभार 🙏💐

No comments:
Post a Comment