गझल - तमा बाळगावी
तमा बाळगावी कुणाची कशाला
भरवसाच आहे कुठे या जगाला
विखारी सुखाचा जरा दंश झाला
ठरे व्यर्थ येथे जगाचा हवाला
कशी ओढ नाही धरेची नभाला
म्हणावे तरी काय ह्या पावसाला
सुखाकारणे त्यागतो मायबापा
कसा धाडतो पुत्र वृद्धाश्रमाला
घरातील भेदी म्हणे सोयऱ्याला
जशी जाळते वात ही कापसाला
क्षुधा पावसाची कशी ही शमेना
जगावे कसे कोरड्या या क्षणाला
कितीही जरी यत्न केला तरीही
सहाणेविना गंध ना चंदनाला
चंदना सोमाणी ©®

सुपर्ब.... लाजवाब...... 👌👌👌
ReplyDeleteप्रत्येक शेर जीवनाचा मतितार्थ सांगून जातो, मनस्पर्शी गझल.... ❤️
मनापासून धन्यवाद 🌹🌹
Delete