Followers

Thursday, 9 November 2023

चंदनाची फुले - रसग्रहण - 3

       शब्दफुलांचा सेतू ...


                          रसग्रहण -सुधाकर वसईकर

मुंबई म.टा. ने पुस्तकाची घेतली दखल....
शब्दफुलांचा सेतू!....
_________________________
चंदना सोमाणी यांच्या भावोत्कट अंतरंगाने 
गझल, कविता, लावणीतून वाचकाच्या अंतरंगाशी जोडलेला शब्दफुलांचा गंधाळ सेतू म्हणजे 
"चंदनाची फुले" हा काव्य संग्रह होय!

या चंदनाच्या भावफुलांचा भावार्थ पानोपानी दरवळत राहतो.

गझलेतील अक्षरांचा लळा अशी काही मैफल भरवतो की, त्यातून निर्मिलेला नवसूर, सुखाची संकल्पना रुजवून आठव क्षणांची फिर्याद ही मांडायला विसरत नाही. माणसांचे रंग, हळव्या भावना, वाचकांस पावसाच्या थेंबाने कधी कधी चिंब भिजवतात तर कोरडेपणाचा ठाव देखील घ्यायला भाग पाडतात. रडत जन्म घेतला असला तरी जिंदगीचा कोंडमारा अक्षर लेखणीतून हसत सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो.

या शब्दांना देवभोळेपण देखील आहे. सरळ सरळ देवाला  कोरे पत्र पाठवून मनातील भावना ठळकपणे अधोरेखित करून जीवनातील अनेक प्रश्नांचे संदर्भ देवाच्या आणि कवयित्रीच्या एकाच मनाने सोडवण्याची भाबडी आशा 
"मी पाठवलेले पत्र" ह्या कवितेत छान व्यक्त झालीय!

लौकिक अर्थाने कवितेतील ओळी सहजसोप्या वाटत असल्या तरी समकालीन वास्तवाशी जोडलेल्या आहेत. प्रतिमांची, रुपकांची रेलचेल नाही की ओढाताण नाही, आणि तरी देखील ही कविता अंतर्मुख करणारी आहे. शब्द अर्थवाही, भाववाही आणि प्रवाही आहेत.

सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या या कवयित्रींचं शब्दांवर विलक्षण प्रेम आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेली ही कवयित्री आनंदाचे भावविश्व निर्माण करण्यात यशस्वी ठरलीय.
सुटसुटीत शब्द, आकलन होण्यास सोपी भाषा, साधे शब्द कवितेत कुठे भव्यता आढळून येत नसली तरी शब्दांचं वैभव मात्र आशयातून प्रकट झालंय.
" शिवाजी " ही गझल संकेत नागपूरकरांनी नुकतीच गायलीय.
आणि...
" सोसवेना भार आहे जिंदगी.."
" करतात हे घाव ते ही दमदार फारसे.."
" मी पाहिले नभाचे तारे हजार वेळा "
" डोळ्यात आसवांचा हा कोणता पहारा "
" काय कसे अन् कुणास ठावुक "

आदि गझल कंपोज केल्यात आहेत आणि लवकरच त्या
नागपूर आकाशवाणीवर त्या प्रसारीत होणार आहेत.

©सुधाकर वसईकर
      कल्याण (पूर्व)

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...