तोंडदेखली नाती आणिक घरपण उरले आहे
कुठून आल्या अगणित लाटा सोबत घेऊन गेल्या
पुन्हा परतणे दुरापास्त हे दडपण उरले आहे
अंगाखांद्यावरती ज्याच्या खेळत होत्या वेली
तसे न कुठले झाड न कुठले अंगण उरले आहे
अवघड होते प्रश्न परंतू सोपे होते उत्तर
त्यातच शोधू निकाल आता जे पण उरले आहे
काळोखाच्या देठावरती फूल उमलले तेव्हा
आता केवळ आभासांचे कोंदण उरले आहे
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment