टाळ प्रत्येकाच्या हाती
ओवी प्रत्येकाच्या ओठी
ज्याच्या त्याच्या मनामध्ये
डोकावितो जगजेठी
हरपून देहभान
करू भजन किर्तन
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल
देह हरेक वेगळा
एक भक्तीचा सोहळा
त्याच्या दर्शनाने होतो
जीव सावळा सावळा
हरपून देहभान
करू किती गुणगान
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल
त्याचा भुलवितो रंग
वेड लावितो श्रीरंग
त्याच्याकडे पाहुनिया
होते दृष्टीही निरंग
हरपून देहभान
एक होत जाते मन
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल
जरी संपली ही वारी
भाव दाटतो अंतरी
ओढ मनाची मनाला
पुन्हा बोलवितो हरी
हरपून देहभान
सोडुनीया अवगुण
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल
चंदना सोमाणी ©®

This comment has been removed by the author.
ReplyDeleteविठ्ठलाच्या मोहक रूपाचे वर्णन करणारा अभंग आणि हा शब्दांचा सोहळा म्हणजे जणू वारीच्या आनंदाचा सोहळा... ❤️❤️💐🙏
ReplyDeleteविठ्ठलाच्या मोहक रूपाचे वर्णन करणारा अभंग आणि हा शब्दांचा सोहळा म्हणजे जणू वारीच्या आनंदाचा सोहळा... ❤️❤️💐🙏
ReplyDelete