Followers

Thursday, 9 November 2023

मराठी गझल - तुझ्या सारखी मी...

मराठी गझल - तुझ्या सारखी मी...

तुझ्या सारखी मी तुला सांग ना तू
मला नाव माझे फुला सांग ना तू

किती दोन डोळ्यातले हेलकावे
किती पापण्यांचा झुला सांग ना तू

जरा मोकळ्या कर मनातील लाटा
विचारात कसल्या मुला सांग ना तू

कशी भुल पडली अशी सोहळ्यांची
कुठे आज तो चौफुला सांग ना तू

लिहीलाय मिसरा जरी एक सानी
तुझे काय जाते उला सांग ना तू

मिळू दे नव्याने मला वेदनाही
जुना बंध आता खुला सांग ना तू

चंदना सोमाणी ©®

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...