Followers

Friday, 10 November 2023

मराठी गझल - मरणाचा होणार सोहळा

  
     मराठी गझल - मरणाचा होणार सोहळा...

मरणाचा होणार सोहळा फार फार तर
असेल माझा जन्म वेगळा फार फार तर

रंग लागला या देहाचा त्या देहाला..
राधेलाही रंग सावळा फार फार तर

एकच असते गोष्ट नव्याने सांगत सुटतो
दारापुढचा एक भोपळा फार फार तर

उलटी गंगा वाहत आहे...हेच सांगण्या
एक पराचा हवा कावळा फार फार तर

हेही माझे... तेही माझे... सारे माझे
जन्मभराचा सोस पांगळा फार फार तर

नातू होतो त्यानंतर मग पणतू साठी
पुन्हा गुंततो पाय मोकळा फार फार तर

जन्म देऊन मृत्यू साठी जो अडकवतो 
तोच लावतो इथे सापळा फार फार तर

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. गझल सम्राज्ञी..... गझलेला काय अभिप्राय द्यावा खरंच कळत नाही...❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 🌹🌹

      Delete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...