मला न कळले आयुष्याचे हिशोब सारे सारे
असे बिनसले आयुष्याचे हिशोब सारे सारे
तिने घेतले पंखाखाली मला न घेता आले
इथेच चुकले आयुष्याचे हिशोब सारे सारे
कळूनही मग जेव्हा काही कळले नाही तेव्हा
किती समजले आयुष्याचे हिशोब सारे सारे
मी, माझा अन् माझ्यासाठी इतके सोपे होते
कसे बिघडले आयुष्याचे हिशोब सारे सारे
अंतिम घटिका त्यानंतरचे राम नाम जपलेले
अरे संपले आयुष्याचे हिशोब सारे सारे
तिने घेतले पंखाखाली मला न घेता आले
इथेच चुकले आयुष्याचे हिशोब सारे सारे
कळूनही मग जेव्हा काही कळले नाही तेव्हा
किती समजले आयुष्याचे हिशोब सारे सारे
मी, माझा अन् माझ्यासाठी इतके सोपे होते
कसे बिघडले आयुष्याचे हिशोब सारे सारे
अंतिम घटिका त्यानंतरचे राम नाम जपलेले
अरे संपले आयुष्याचे हिशोब सारे सारे
चंदना सोमाणी ©️
जीवनात काही हिशोब न केलेलेच बरे. कारण हिशोब आला की नाती दुरावतात नी हिशोबा अंती अखेरीस शून्य उरतो. या हिशोबालाच काही अर्थ उरत नाही. हिशोबानी घरं तुटली, नाती वेगळी झाली, नी रक्ताची नाती क्षणार्धात परक्या सारखी झाली. एकमेकाला जीव लावणारी नाती, आपल्यालाच पाण्यात बघू लागली... हा हिशोबच मुळात खूप जीवघेणा शब्द आहे. आपल्या कडेच येऊन, आपल्याच घरी, परकेही आपला हिशोब मांडू लागतात अशी ही वेळ कधी कधी येते. हा हिशोब किमान मला तरी कधीच जमलेला नाही.
कसलं भारी लिहून ठेवलंय ताई. आईच्या पोटी असताना पासून तर लहानाचा मोठा होई पर्यंत आपण कायम आईच्या पंखाखाली असतो. पण आकाशी झेप घेण्या इतपत मोठ्या झालेल्या आपल्या पंखात, आईच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, आपल्याला जर तिला आपल्या पंखात सामावून घेता आले नाही तर तिथे मात्र आयुष्याचा साराच हिशोब चुकतो. सर्वकाही कळून आणि उमजूनही आपल्याला ते करता येऊ शकलं नाही की आयुष्यात सर्वत्र काळोखी छटा दिसू लागतात. शेवटी बघतो तर काय....आपलं आयुष्य संपलेलं असतं. जीवनात कमावलेली नातीगोती, ऐश्वर्य, प्रेम... सारं सारं काही इथेच सोडून कुठे तरी दूर निघून जायचं असतं. तरी पण आयुष्याचा हिशोब कधीच जुळत नाही.
आपली ही गझल वाचून निःशब्द झालो ताई मी. आपणच कुठे तरी अनुभवलेलं, तुम्ही लिहून जाता, आणि मनात सर्व कालवाकालव सुरू होऊन जाते. शब्द टोचून जातात आणि भावनांना वाट मोकळी करून जातात.
यावेळी तुमचे अभिनंदन मुळीच करणार नाही, कारण तुमचे शब्द जीवनातील आठवणींना असे काही स्पर्शून गेले की सारा हिशोबच चुकता करून टाकला. सलाम तुमच्या लेखणीला 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नरेश लोंढे -गायक आणि संगीतकार यांचा अप्रतिम अभिप्राय❤️❤️

No comments:
Post a Comment