Followers

Friday, 17 November 2023

मराठी गझल - बघू नंतर

मराठी गझल - बघू नंतर...

कुठे धरती कुठे अंबर..बघू नंतर
किती दोघातले अंतर.. बघू नंतर

कुणाला लागली घरघर.. बघू नंतर
कुणाची चालली मरमर.. बघू नंतर

कुणी भरली इथे घागर... बघू नंतर
कुणाचा आटला सागर... बघू नंतर

इथे झाले कुणी बेघर.. बघू नंतर
कुण्या दारी किती झुंबर..बघू नंतर

मला ना भेटला आदर.. बघू नंतर
कुणाची केवढी चादर... बघू नंतर

जरी झालेच मन जर्जर.. बघू नंतर
स्मृतींचे साचलेले थर... बघू नंतर

चंदना सोमाणी ©®                      

1 comment:

  1. गझल सम्राज्ञी सलाम 🫡 🫡 🫡 🫡 🫡 अंबर अंतर.. घरघर मरमर.. घागर सागर.. आदर चादर.. बेघर झुंबर.. जर्जर थर..
    शब्दांच्या अनोख्या सुंदरतेवर काय काय लिहू 🤔
    कुठल्या कुठल्या शेरावर किती किती दाद देऊ..
    एकापेक्षा एक वरचढ शेर, तुझ्या गझल इतक्या उंचीच्या असतात की आधी कमेंट करावी मग बाकीचे..बघू नंतर 💗💗💗😘😘😘😘😘😘😘

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...