Followers

Sunday, 26 November 2023

गाऊ विठ्ठल विठ्ठल


टाळ प्रत्येकाच्या हाती
ओवी प्रत्येकाच्या ओठी
ज्याच्या त्याच्या मनामध्ये
डोकावितो जगजेठी 

हरपून देहभान 
करू भजन किर्तन 
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

देह हरेक वेगळा
एक भक्तीचा सोहळा
त्याच्या दर्शनाने होतो
जीव सावळा सावळा

हरपून देहभान
करू किती गुणगान
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग 
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल 

त्याचा भुलवितो रंग
वेड लावितो श्रीरंग
त्याच्याकडे पाहुनिया
होते दृष्टीही निरंग

हरपून देहभान
एक होत जाते मन
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

जरी संपली ही वारी
भाव दाटतो अंतरी
ओढ मनाची मनाला
पुन्हा बोलवितो हरी

हरपून देहभान
सोडुनीया अवगुण
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

चंदना सोमाणी ©®

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. विठ्ठलाच्या मोहक रूपाचे वर्णन करणारा अभंग आणि हा शब्दांचा सोहळा म्हणजे जणू वारीच्या आनंदाचा सोहळा... ❤️❤️💐🙏

    ReplyDelete
  3. विठ्ठलाच्या मोहक रूपाचे वर्णन करणारा अभंग आणि हा शब्दांचा सोहळा म्हणजे जणू वारीच्या आनंदाचा सोहळा... ❤️❤️💐🙏

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...